ब्रह्मपुरी तालुक्यातील ट्रॅक्टर व कारचा अपघात…एक ठार दोन जखमी रणमोचन फाट्याजवळील घटना

रितेश देशमुख,चंद्रपूर

चंद्रपूर :- ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन(खरकाळा) फाट्याजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व कार क्र.33V245 ने समोरून जोरदार धडक दिली .यात कार मधील गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील भाजपाचे जिल्हा सचिव तथा ‘मन की बात’कार्यक्रमाचे जिल्हा संयोजक आनंद गण्यापवार(45) रा. चामोर्शी जिल्हा गडचिरोली यांचा जागीच मृत्यू झाला तर चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा गडचिरोली जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार गंभीर जखमी आहेत .तर चालक हे एअरबॅगमुळे बचावले.त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सदर घटना दि.27जानेवारी2022 ला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील रणमोचन येथील वैनगंगा नदीच्या घाटावरुन अवैध रेती उत्खनन रात्रभर सुरू आहे. अपघात घडलेल्या ट्रॅक्‍टर हा अवैध रेती उत्खनन करणारा ट्रॅक्टर होता . ट्रॅक्टर चे मालक किशोर बालपांडे रुई हे आहेत असे असल्याचे परिसरात बोलले जात आहे. रुई येथील किशोर बालपांडे हे अवैध रेती उत्खनन करणारे किंग व प्रशासकीय अधिकाऱ्याचे पोशिंदा सल्याचे बोलले जात आहे. अशा याच ट्रॅक्टर मालकावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील लोक जनतेकडून केला जात आहे.

सदर घटनेचा तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत. ब्रम्हपुरी तालुक्यातील बहुतांश रेती घाटाचे लिलाव झाले नसतांना मागील कित्येक महिन्यापासून रेती तस्करीतील दलाल ,महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकारी यांच्या संगनमताने वैनगंगेचे पात्र अक्षरशः ओरबाडले जात आहे. या तस्करीत रुई या गावातील किशोर बालपांडे नामक व्यक्ती हा महसूल व पोलीस प्रशासनातील दलाल असल्याचे बोलले जात आहे. आजघडीला या बालपांडे च्या इशाऱ्यावर अवैध रेती तस्करी सुरू आहे. हाच किशोर बालपांडे महसूल व पोलीस प्रशासनाला दर महिन्याला पॉकेट पैशाची थैली पोहचविण्याचे विश्वासपूर्वक काम करत असल्याचे बोलले जात आहे.

बालपांडे च्या घरी कित्येक ब्रास रेतीची साठवून ठेवल्या चे रुई येथील कित्येक नागरिकांनी सदर प्रतिनिधी जवळ माहिती दिली आहे. आज रनमोचन घाटावरून रेती घेऊन बालपांडे याचा ट्रॅक्टर जुगनाला ह्या गावी गेला. तिथून रेती खाली करून येत असताना सदर भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे या ट्रॅक्टर ची कुठलीच पासींग नसल्याचे कळते .विना नंबर च्या ह्या ट्रॅक्टर ने रात्रंदिवस रेती तस्करी करण्यात येत आहे.

दरम्यान या क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी येथील खाजगी रुग्णालयात भेट देऊन जखमी अतुल गण्यारपवार यांच्या तब्बेतीची चौकशी केली. दोषी ट्रॅक्टर मालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here