तालुक्यातून आज ३५ जणांचे “थ्रोट स्वॅब” प्रयोगशाळेत पाठविण्यात आले… नगरधन बाधिताच्या संपर्कातील ११ जणांचा समावेश…

राजू कापसे – रामटेक

नगरधन येथील कोरोनाबाधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या आणखी ११ जणांसह तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील २४ जणांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी नागपुरला पाठविण्यात आले.विशेष म्हणजे काल नगरधन येथील बाधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या नगरधन -चिचाळा येथील ३५ जणांचे अहवाल “निगेटिव्ह” आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तालुक्यातील नगरधन येथे २७ जूनला एक एकोणतिस वर्षिय तरूण कोरोना बाधित असल्याच्या अहवालानंतर त्याच्या थेट संपर्कातील त्याच्या पत्नीसह १० जणांना नागपुर येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.तर इतर ३५ जणांना रामटेकला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते.त्या सर्वांचे थ्रोट स्वॅब नागपुरला पाठविण्यात आले होते ,त्या सर्व ३५ जणांचा अहवाल “निगेटिव्ह” आला.

त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.आज पुन्हा नगरधन – चिचाळा येथील ११ जणांना घरीच विलगीकरणात ठेवून त्यांचे थ्रोट स्वॅबचे नमुने तसेच तालुक्यातील मनसर,करवाही,हिवराबाजार व भंडारबोडी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घरीच विलगीकरणात असलेल्यांचे थ्रौट स्वॅबचे नमुने नागपुरला पाठविण्यात आले आहेत.

त्यांचा अहवाल उद्या,परवा पर्यंत प्राप्त होईल. तसेच नगरधन येथील बाधित तरूणाची प्राथमिक तपासणी व माहिती घेणार्‍या आरोग्य कर्मचारी,वैद्यकीय अधिकारी यांचे घशाच्या द्रावाचे नमूने बुधवारी नागपुरला पाठविले जातील व अहवाल प्राप्तीनंतर त्यांना “क्वारंटाईन”करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.चेतन नाईकवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here