शेतकऱ्यांच्या आंदोलनात शेतकरी नेत्यांवर गोळीबाराचा कट हाणून पाडला…शूटरने दिल्ली पोलिसांवर केला गंभीर आरोप…

न्यूज डेस्क – काल सरकारशी चर्चा केल्यानंतर आता शेतकरी 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडसाठी एकत्र आले होते. परंतु त्यादरम्यान, शुक्रवारी रात्री पकडलेल्या एका मास्क घातलेल्या व्यक्तीने शेतकरी चळवळीत हिंसाचार पसरवण्याचा कट रचल्याचा दावा केला. या शूटरने दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला असून 26 जानेवारीला चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचे सांगितले आहे.

पकडण्यात आलेल्या शूटरने दिल्ली पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहे. 26 जानेवरी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला आहे. या रॅलीत घुसून शेतकऱ्यांच्या नेत्यांवर गोळीबार करण्याचा कट त्याने रचला होता. ज्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळले जाईल.

शेतकऱ्यांनी या संशयित शूटरला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले आहे. 23 ते 26 जानेवरीदरम्यान शेतकरी नेत्यांवर गोळीबार करण्याचा प्लॅन आखला होता.  या संशयित शूटरने जाट आंदोलनामध्ये सुद्धा वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.

शेतकऱ्यांनी या संशयित शूटरला पकडले आणि मीडियाच्या समोर उभे केले. त्यावेळी त्याने संपूर्ण कटाबद्दल माहिती दिली. 26 जानेवारी रोजी शेतकरी नेते जेव्हा व्यासपीठावर येतील तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश मिळाला होता.

या शूटरने आपल्याला चार जणांवर गोळीबार करण्यास सांगितले असून त्यांचे फोटो सुद्धा आपल्याला देण्यात आले होते.  तो 19 जानेवारी पासून सिंघु बॉर्डरवर आला होता. 26 जानेवरी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. त्यावेळी त्यांच्यासोबतच जाण्यास सांगितले होते, असा खुलासाही या शूटरने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here