मृत्युदर कमी करण्यासाठी संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

पालघर जिल्ह्यात कोविड 19 ने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून ही गोष्ट चिंताजनक असल्याचे सांगून जर मृत्यूदर कमी करायचा असेल तर संशयित रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करून इस्पितळात दाखल व्हावे असे विनंतीवजा आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

आतापर्यंत मृत्यू पावलेल्या व्यक्तींपैकी ६०% व्यक्ती या इस्पितळात दाखल झाल्यानंतर७२ तासांमध्ये मृत झालेल्या आहेत ,यावरून संशयित रुग्ण चाचणी करून घेण्यास पुढे येत नाही तदनंतर गंभीर परिस्थिती आल्यावर इस्पितळात दाखल होत असल्याने उपचार करण्यास पुरेसा कालावधी मिळत नाही.परिणामी रुग्णाचा मृत्यू ओढवतो.

यासाठी ज्या गावात अथवा प्रभागात पाचपेक्षा जास्त रुग्ण कार्यरत (ऍक्टिव्ह)असतील तेथे तपासणी शिबिर लावण्यात येईल तसेच दररोज पाचशे RTPCR आणि दोनशेहून अधिक अँटीजन टेस्ट आता करता येऊ शकतील ज्या रुग्णाला लक्षणं नाहीत परंतु जो कोरोना बाधित आहे अशा रुग्णाला संबंधित तालुक्यांमधील कोव्हीड केअर सेंटर( CCC)मध्ये ठेवता येईल.

रिव्हेरा,टिमा,पोशेरी या कोव्हीड रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन टॅन्क बसवण्यास परवानगी मिळाली असून ऑक्सिजन ची सुविधा लवकर उपलब्ध होईल. पुढील आठवड्यापासून डहाणू MRHRU लॅब मध्ये २०० मोफत चाचण्या करता येणार असून जास्तीत जास्त चाचण्या करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

तरीही कोणाला काही मदत हवी असेल 18001215532 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच प्रत्येक तालुक्याअंतर्गत वॉर रूम स्थापित केल्या आहेत, त्यासाठी covidbed.palghar.info ही लिंक दिली असून याद्वारे कोव्हीड 19 चाचणी, बेड ची उपलब्धता ,घरी विलगीकरण इ.बाबींची माहिती मिळू शकते.त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन कोरोना वर मात करूया असे नम्र आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here