मोबाईल सट्टा घेणाऱ्यावर तिरोडा पोलिसांची कार्यवाही, ३ आरोपी सह १,०४,७२५ रूपयाचा मुद्दे माल जप्त

गोंदिया – अमरदिप बडगे

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलिस स्टेशन अंतर्गत 17 नोव्हेंबर ला पोलीस शहरात पेट्रोलिंग करीत असतांना 21/00 वाजता सुमारास गोपनीय सूत्रधार कडून मिळालेल्या माहितीनुसार महात्मा फुले वॉर्ड तिरोडा येथील एका घरातील मागील खोली मध्ये काही इसम बसून लोकांन कडून मोबाईल वर सट्टा चे आकडे लिहून पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळवीत आहेत.

मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाड टाकले असता संदीप चंदनदास गजभिये रा. महात्मा फुले वॉर्ड तिरोडा, सुरेश चमरु घोडमारे रा. संत कवरराम वॉर्ड तिरोडा , डेव्हिड रविकिरण बडगे रा. आंबेडकर वॉर्ड तिरोडा असे तीन व्यक्ती लोका कडून पैसे घेऊन मोबाईल वर सट्टा चे आकडे लिहून हार जित चा जुगार खेळवितांनी मिळून आले, त्यांच्या जवळून 4 मोबाईल हँडसेट, 2 कॅल्क्युलेटर ,1 लाकडी टेबल 2 चेयर, 5 दाटपपेण , नगदी 1000/- रुपये, 2 मोटर सायकल,

सट्टा चे आकडे चा हिशोब चे कागदपत्रे असा एकूण 1, 04, 725/ रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून, वरील आरोपी विरुद्ध कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम सह कलम 109 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात वरील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

सदर गुन्ह्यात आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सदर कार्यवाही नितीन यादव, उप विभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्गदर्शनाखाली योगेश पारधी पोलीस निरीक्षक, पो स्टे तिरोडा यांच्यासोबत महिला पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे, नापोशी श्रीरामे, बर्वे, वाढे,चालक पोशी प्रशांत काहलकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here