तिरोडा पोलिसांची कार्यवाही…२ दारू अड्यावर धाड एकूण २ लाख ३६ हजार ८०० रुपये चा माल जप्त…

गोंदिया – अमरदिप बडगे

दिनांक 03/08/21 रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरून संत रविदास वॉर्ड तिरोडा येथे खालीलप्रमाणे 2 दारू अड्यावर छापा टाकण्यात आलेला आहे.सुखवतां बाबुराव बरीयेकर यांच्या घरझडतीत 34 प्लास्टिक च्या मोठया पोतडीत 1360 किलो सडवा मोहाफुल किं. अंदाजे 108800/- रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

मायबाई प्रकाश बरयिकर हिच्या घरझडतीत 40 प्लास्टिक मोठया पोतडीत 1600 किलो सडवा मोहाफुल किं 128000/- रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आलेला आहे. असा एकूण 236800/-रुपये चा मुद्धेमाल जप्त करण्यात आलेला आहे.

दोघांचे विरुद्ध दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही आम्ही सोबत सपोनि अभिजित जोगदंड, पोउपनि केंद्रे, नापोशी श्रीरामे, सवालाखे, पोशिं बडवाईक, भांडारकर, मनापोशी भूमेश्वरी तिरळे, मपोशी नंदा बडवाईक यांनी केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here