नागपूर – शरद नागदेवे
समता बंधुता व न्यायावर आधारीत समाजरचना म्हणचे प्रबुध्द भारत निर्मितीचे डाँ.बाबासाहेब आंबेडकराचे स्वप्न साकारण्यासाठी धम्मचळवळ नव्या जोमाने ऊभी करणे काळाची गरच असल्याचे प्रतिपादन मा.अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ यांनी नँशनल पिपल्स सोशल आर्गनायझेशन,
डाँ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक ,सांस्कृतिक संघटना,नागभूमी रंगमंच आणी रमाई बुध्द विहार यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित बुध्द आणि त्याचा धम्म या ग्रथांचे वाचन स्पर्धेच्या स्पर्धकांना बक्षिस वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना व्यक्त केले.
यावेळी धम्म मंचावर चित्रपट अभिनेते रवि पाटील,नँशनल पिपल्स सोशल आँरगानायझेशन चे अध्यक्ष राजेश ढेंगरे,माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे,रमाई बुध्द विहार ऊंटखाना अध्यक्षा, प्रमिलाताई मुन ऊपस्थित होते. पूढे बोलतांना ते म्हणाले आज समाजात धम्माविषयी अनास्था असुन हिंदुच्या रितिरिवाज आज बुध्दीष्ट लोक धुमधडाक्यात साजरे करित आहेत.
लग्न समारंभात नाचगाणे,श्रीमंतीचा देखावा,हळदीचे कार्यक्रम,अशामुळे बौध्द म्हणून आपण आपली ओळख निर्माण करु शकलो नाही.,22प्रतिज्ञाचे पालन करतांना कुणीही दिसत नाही.त्यामूळे धम्म चळवळीला अधोगती आली आहे.म्हणूनच पून्हा नव्याने धम्म चळवळ ऊभी करण्यासाठी महिलांनी पूढाकार घेतला तरच धम्म चळवळ वृध्दींगत होऊ शकते असे ते म्हणाले.
यावेळी गुणवत्ता प्राप्त स्पर्धकांचा रोख रक्कम ,सन्मान पत्र व पूष्प देऊन सन्मान करण्रयात आला तसेच *मा.अनिल हिरेखन यांची नागपूर विद्यापीठाच्या कुलसचिवपदी शासनातर्फे नियुक्ती झाल्याबद्दल मा.अरुण गाडेयांचे हस्ते सत्कार करण्यात आला.याप्संगी भोजराज हाडके,मुकेश शंभरकर व गनमान्य व्यक्ती ऊपस्थित होते. कार्यक्रमाचे भुमिका व संचालन गौतम ढेंगरे यांनी केले,आभार मुकेश शंभरकर यांनी केले.