आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक…

न्यूज डेस्क – भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला. एका युवकाने ताफ्यातील गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड मारून पळाला. सुदैवाने यामध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही.

गाडीवर दगड फेकणारा तो व्यक्ती कोण होता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. तरुण पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला.

गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. सोलापूर येथील मड्डी वस्ती येथे त्यांच्या गाडीवर हल्ला कऱण्यात आला. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. अशात त्यांच्या गाडीवर झालेल्या या हल्ल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here