शाहरुख खानचे ‘पठाण’ चित्रपटासाठी कारवर थरारक अ‍ॅक्शन सीन… पहा व्हिडीओ

न्युज डेस्क – सध्या शाहरुख खानच्या “पठाण” चित्रपटाची शूटिंग दुबईमध्ये सुरु असून शाहरुख खान आपल्या आगामी “पठाण” या चित्रपटासाठी चर्चेत आहे. आता चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, जे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत असून ते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.

शुटिंगचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत, ज्यात शाहरुख खान एका फिटिंग सीक्वेन्सवर फिरत्या कारच्या वर उभा असल्याचे दिसत आहे.

हे व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित केले गेले आहेत ज्यात जबरदस्त सीन दाखविले जात आहेत. शाहरुख खानच्या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, काही काळापूर्वी अशी बातमी मिळाली होती की ‘पठाण’ चित्रपटातील बुर्ज खलिफाभोवती एक मोठा एक्शन सीक्वेन्स बनवण्याची योजना आखली गेली होती, ज्यात शाहरुख खान जगातील सर्वात उंच इमारतीत सर्वात वरच्या बाजूस दिसणार आहे.

अलीकडेच सलमान खानने मुंबईस्थित वायआरएफ स्टुडिओमध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये एक कॅमिओ शूट केला आहे. ‘बिग बॉस १४’ च्या फिनालेमध्ये त्याने आपल्या चित्रपटाच्या शूटिंगबद्दल सांगितले ज्यामध्ये त्यांनी ‘पठाण’ आणि टायगर ३ चा उल्लेख केला होता.अभिनेता शाहरुख खान सुमारे 2 वर्षांच्या नंतर ‘पठाण’ चित्रपट मध्ये पुनरागमन करीत आहे. तो अखेर वर्ष २०१८ मध्ये ‘जीरों’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसला होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here