सोयाबीन काढणी करीत असताना मजुराचा थ्रेशर मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू…

न्यूज डेस्क- शेतात सध्या सोयाबीन काढणीची लगबग सुरु झाली असल्याने बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पळसो येथे सोयाबीनची काढणी करीत असतांना २७ वर्षीय शेत मजुराचा थ्रेशर मशीन मधे हात गेल्याने मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आज नवरात्रीच्याच दिवशी ही घटना घडल्याने गावात शोककळा पसरली आहे.

बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम पळसो बढे येथे कासनपूर शेत शिवारात सोयाबीन काढणी करीत असताना घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये दुपारी १ वाजताच्या सुमारास थ्रेशर मशीनवर सोयाबीन काढण्याकरिता असलेल्या पळसो बढे येथील २७ वर्षीय मजुरांचा हात थ्रेशर मध्ये गेल्याने मृत्यू झाला आहे.संजय चिंतामन सोळंके असे मजुराचे नाव आहे.

सदर युवक थ्रेशर मशीन सोयाबीनचा घास मशीनमध्ये लावताना हातासह डोके खेचल्या जाऊन त्याचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला. घटनेची फिर्याद गजानन रामदास लाळे राहणार पळसो बढे यांनी बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून याप्रकरणी 50/20 कलम 174 नुसार मर्ग दाखल करण्यात आला असून बोरगाव मंजू

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतक मजूर युवक संजय चिंतामन सोळंके वय 27 वर्षे राहणार पळसो बढे यास शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले असून पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. कोकरे,पो. कॉ. अंकत नागरगोजे, आयबाईक, पो.कॉ. प्रविण वाकोडे, पो. कॉ. संतोष गवई करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here