गोरेगाव-गोंदिया मार्गावर एसटी बसचा अपघात, तीन प्रवासी जखमी…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 253 वर गोरेगाव तालुक्यातील ढिमरटोली गावाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारातील एसटी बसचा अपघात घडला. या गोंदिया-नागपूर बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात आज सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 ते 8 वाजताच्या दरम्यान घडला.

सदर बस क्रमांक (एमएच 07 सी 9147) गोंदियाहून नागपूरला जात होती. यात 30 प्रवासी होते. अपघात झाल्याने 3 प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वेगाने येत असलेल्या एका दुचाकी वाहनचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बस महामार्गाच्या खाली उलटून एसटी बसचा अपघात घडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here