मोर्णा धरणाच्या पायथ्याशी पास्टुल गावाजवळ आढळली बिबट्याची तीन पिल्ले…मादीच्या प्रतिक्षेत वनविभागाने लावले ट्रैप कैमेरे

पातुर तालुका प्रतिनिधी
काल दुपारी तीन वाजता धरणाच्या पायथ्याशी गावकऱ्यांना बिबट मादीची तीन पिल्ले आढळून आल्याची माहिती पातूर वनविभागाला मिळाली. वनविभागाने पिल्लांना कॅरेट मध्ये ठेवून मादीच्या प्रतीक्षेत ट्रैप कॅमेरे लावले आहेत.


येथील संतोष घुगे यांनी दुपारी बिबट्या मादीचे तीन पिल्ले आढळून आल्याचे माहिती वन विभागाला दिली त्यावरून तातडीने वनविभागाने मोर्णा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या तीन पिल्लांना तेथून जंगलाच्या जवळ एका कॅरेटमध्ये ठेवलेत आणि वन विभागाच्या गाडीमध्ये बसून बिबट्या मादीची प्रतिक्षा करीत आहेत सदर पिल्ले केवळ तीन ते चार दिवसांची असून या परिसरात दोन बिबट आणि एक मादी नेहमीच पास्टुल गावाचे यांच्या दृष्टिपथात येते सदर परिसरात खानापूर बीट वन या क्षेत्रात आहे


रेंज फॉरेस्ट ऑफिसर धीरज मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन पिल्लाच्या आईची वाट अजून एक-दोन दिवस पहिली जाणार आहे तत्पूर्वी सदर मादीने पिल्लांना नेल्यास पुढील कारवाई थांबवण्यात येईल मात्र सदर माझी पिल्लू घेण्यात आलीच नाही तर नागपूरची रेस्क्यू टीम पाचारण केले जाणार आहे त्यानंतर या जंगलामध्ये सदर मादिचा शोध घेतला जाणार आहे असल्याचे राऊंड ऑफिसर तानाजी शिंदे यांनी सांगितले.

सध्या याठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावले जाणार आहेत त्याबरोबरच वन विभागाचे कर्मचारी येथे रात्रंदिवस नजर ठेवून आहेत .या भागात तीन बिबट असल्यामुळे नागरिक नेहमीच दहशतीखाली असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here