चिल्हार बोईसर रस्त्यावरील अपघातात तीन जखमी…भरधाव वेगातील दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोची कारला धडक…

पालघर तालुक्यातील चिल्हार बोईसर रस्त्यावर चरी गावच्या हद्दीत मंगळवारी (ता.08) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील टेम्पोने कारला धडक दिल्याने अपघात झाला होता.यात कार मधील तिन जण जखमी झाले असून अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास चिल्हार बोईसर रस्त्यावर चरी गावच्या हद्दीत वँगेनार कारला भरधाव वेगातील दुध वाहतूक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला होता.यात टेम्पोचे पुढचे दोन्ही टायर तुटून मागे आले होते.तर कारच्या पुढचा भाग चुरा झाला असून कारचालकाला मोठी दुखापत झाली होती. वाहनात सुखरूप असलेल्या एका व्यक्तीने स्थानिकांच्या मदतीने सर्वांना बाहेर काढले होते.

अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक पळून गेला होता. कार मधील अनिल टाना (वय.66) रा.कांदिवली, निखिल राय चुरा (वय.60)रा.अंधेरी, देवेंद्र राय चुरा (वय.73) रा.बोईसर मान टाटा हाउसिंग सोसायटी हे तीन जण जखमी झाले होते. दिव्यांग असलेले देवेंद्र चुरा यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाता नंतर दोन तासांनी मनोर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलीस नाँटरिचेबल
अपघात झाल्यानंतर लगेचच अपघात स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व पत्रकारांनी मनोर पोलीस ठाणे आणि पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता.परंतु दुरध्वनी बंद आले होते.त्यानंतर पोलीस कंट्रोल रूमला संपर्क साधल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here