Home Marathi News Today

पैश्याची मागणी करून शासकीय कर्मचाऱ्यास धमकी व मारहाण; खंडणीचा गुन्हा दाखल…

अहमदपूर – बालाजी तोरणे

अहमदपूर येथील तहसील कार्यालयाचे स्वस्त धान्य गोदाम किप्पर यास गोदामाच्या आवारात जाऊन दि १३ नोव्हेंं रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमारास एका इसमाने पैश्याची मागणी करून धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी अहमदपूर पोलीसात सदरील इसमाविरूध्द खंडणी, शासकीय कामात अडथळा आदी कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन अरोपीला अटक करण्यात आली आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की,राजकुमार सूर्यकांत भगत शासकीय धान्य गोदाम किप्पर तहसील कार्यालय अहमदपूर येथे गोदाम किप्पर म्हणून नोकरीस असून  दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वार शुक्रवार वेळ अंदाजे दुपारी 12:15 वाजता सुभाष सोनकांबळे हा माझ्याकडे गोडाऊन मध्ये येऊन आर्थिक खंडणीची मागणी करून धान्याची लूट करण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी त्यांनी मागितलेल्या दहा हजार रुपयाची खंडणी देण्यास नकार दिला व धान्याची लूट करण्याचा प्रयत्नास विरोध केला.

तेव्हा त्याने त्याच्या खिशातील च्याव्याचा गुच्छा व किचन च्या साह्याने माझ्यावर एका हाताने शर्ट व गळा धरून दुसऱ्या हाताने वार करण्यास सुरुवात केली सदरील सपासप केलेल्या वरामुळे मी मूर्च्छित पडलो तेव्हा गोडाऊन मधील हमाल कामगारांनी मला सोडून तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणले याउपर त्याने येथे नोकरी कशी करतोस तुझ्यावर तर ॲट्रॉसिटी विनयभंग सारखे गुन्हे दाखल करतो,

व तुला नोकरीवरून काढून खडी फोडायला पाठवतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादिवरून अहमदपूर पोलीसात सदरील आरोपी सुभाष सोनकांबळे याच्या विरूध्द भारतीय दंड संहिता 1860 कलम 353,332,384 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.    

सदरील गुन्ह्याच्या तपासकामी पोह सुहास बेंबडे, पोह पुंडलीक केंद्रे, पोना साळवे, पोकॉ परमेश्वर वागदकर,पोकॉ नारायण बेंबडे आदींनी सहकार्य केले. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी आश्विनी शेलार,पोलीस निरिक्षक सुनिल बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र केदार हे करीत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!