ताजमहालमध्ये बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी…फोन करणाऱ्या माथेफिरूला अटक…

न्यूज डेस्क- उत्तर प्रदेशातील आग्रा ताजमहाल येथे बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर पर्यटकांमध्ये प्रचंड खळबळ माजली.तदनंतर हि माहिती पोलिसांना कळताच उच्च पोलीस अधिकाऱ्यासह मोठा फौजफाटा ताजमहाल परिसरात पोहचला.सीआयएसएफ ने तात्काळ पर्यटकांना ताजमहाल मधून बाहेर काढून परिसर सील करून बॉम्ब शोधण्यासाठी मोठी मोहीम राबविली गेली.

मात्र, नंतर बॉम्बची बातमी खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.शोधानंतर ताजमहाल पुन्हा उघडण्यात आला आहे.
बॉम्बसंदर्भात याबाबत पर्यटक आणि सीआयएसएफ यांच्यातही चर्चा झाली.
असे सांगितले जात आहे की ताजमहालमधील बॉम्बबद्दल कुणीतरी माथेफिरूने पोलिसांना कळविले होते.

सीओ सदर यांच्या नेतृत्वात टीमसह शोध घेण्यात आला. यानंतर आग्राचे आयजी म्हणाले की बॉम्बची बातमी खोटी असून,तेंव्हा लोकांना काळजी करण्याची गरज नाही. फिरोजाबाद येथील एका माथेफिरूने फोनद्वारे या बॉम्बबद्दल खोटी माहिती दिली होती, अन तो आरोपी पकडला गेला असून चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here