मुंबई येथे २५ नोव्हेंबरला होणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात सांगली जिल्ह्यातील हजारो चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी होणार :- संजय व्हनमाने…

सांगली – ज्योती मोरे

राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ सांगली या महासंघाचे वतीने दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास वारस हक्काने नियुक्ती मिळावी, अनुकंपा भरती विनाआट करावी व बदली कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत तात्काळ कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील २००० कर्मचारी आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई येथे मोर्चा होणार आहे,

यासाठी सांगली महासंघाच्या वतीने प्रशासकीय इमारत, महसूल, कृषी, आय.टी. आय, आर.टी.ओ., वस्तू व सेवाकर, पाटबंधारे, मिरज सिव्हिल, कोषागार, भूमी अभिलेख, जिल्हा निबंधक, जिल्हा परिषद या ठिकाणी गेट मिटिंग घेण्यात आली.

यावेळी सांगली महासंघाचे अध्यक्ष संजय व्हाणमाने, सरचिटणीस गणेश धुमाळ, कार्याध्यक्ष मिलिंद हारगे, कोषाध्यक्ष संदीप सकट, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला कुटे, कुमार कोलप, संजय विभूते, राणी कराळे, संभाजी यामगर, नवनाथ सोडभिषे, राहुल जेडे, माधुरी कांबळे, महेश कांबळे, पांडुरंग कांबळे, अनिल कांबळे, प्रकाश घोडके आदी कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here