यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा एक ऐतिहासिक निर्णय…गणेशोत्सव असणार आरोग्योत्सव

प्रतिनिधी – गणेश तळेकर

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाचा ८७वा गणेशोत्सव मूर्ती स्थापना व विसर्जन असा कोणताही सोहळा साजरा न करता “आरोग्योत्सव” म्हणून श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साजरा करण्यात येणार आहे. ११ दिवस रक्तदान आणि प्लाझ्मादान उपक्रम घेण्याचा निर्णय मंडळाने सभेत घेतला आहे.

आपणा सर्वांना माहित असेल की ज्यावेळी महाराष्ट्र राज्यात कोरोना पाश्र्वभूमीवर “जनतेने काळजी घ्या” असा मजकूर फलक मंडळाने लावला त्यावर चायना वायरस लिहीत पहिला निषेध मंडळाने नोंदविला. रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच १५४६ रक्तदात्यांनी रक्तदान करून मंडळाने पुढाकार घेतला. Ambulance आणि डॉक्टरांच्या मदतीने जनता क्लिनिक दक्षिण मध्य मुंबईत राबविले. मंडळाचे डायलसिस सेवा देखील या काळात सुरू ठेवली.

आरोग्योत्सव साजरा करीत असताना रक्तदान, प्लाझ्मादानला प्राधान्य देऊन अधिकाधिक रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प, गलवान खोर्‍यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रति योग्य मान सन्मान, तसेच कोरोना रोगाच्या लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना मदतीचा हात असे एक ना अनेक संकल्प राबवून सेवा करण्याच्या मंडळाचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here