निपाणी तालुक्यातील हा मार्ग ठरतोय जिव घेना…

बेळगाव – राहुल मेस्त्री

बेळगाव जिल्ह्यातील, निपाणी तालुका येथील बेनाडी ते कुन्नूर या तीन किलोमीटरच्या मार्गावर बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोठ मोठे खड्डे पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे.तर हा मार्ग जीवघेणा ठरतोय की काय असे म्हणावे लागत आहे.

निपाणी ते हुपरी मार्गावरील कर्नाटक महाराष्ट्राला जोडणारा महत्वाचा असा हा राज्य मार्ग असून. या मार्गावरूनच निपाणी तालुक्यातून कर्नाटकच्या अनेक शहरातून, खेडयापाडयातुन प्रवासी महाराष्ट्र मधील यळगुड,हुपरी, इंचलकरंजी, सांगली-मिरज यासारख्या अनेक गावामध्ये विविध कामानिमित्त नियमित येत-जात असतात.

सध्या या मार्गावर बेनाडी पासून कुन्नुरपर्यंत रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी ,तीनचाकी, चारचाकी वाहन धारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.

लॉक डाऊनच्या काळात या रस्त्यावर सर्व वाहतूक पूर्णपणे बंद होती.पण सध्या या मार्गावरील सर्व वाहतूक पुर्ववत सुरू झाल्याने वाहनांची रहदारी वाढली आहे… पण या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे.

सदरच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारक व प्रवाशांतुन होत असुन हा रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here