Tuesday, April 16, 2024
Homeराजकीयकर्नाटक विधानसभा निवडणूकीचा असा आहे कार्यक्रम…

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा असा आहे कार्यक्रम…

Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या तारखा जाहीर केल्या. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता आहे आणि बसवराज बोम्मई मुख्यमंत्री आहेत. कर्नाटकात एकूण 5,21,73,579 मतदार आहेत, तर 9.17 लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. 1 एप्रिल रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही मतदान करता येणार आहे. 100 बुथवर दिव्यांग कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. तर 10 मे रोजी मतदान होणार आहे. 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या JD(S) – काँग्रेस आघाडीचे सरकार पडल्यानंतर जुलै 2019 मध्ये भाजप कर्नाटकमध्ये सत्तेवर आला. जेडीएस-काँग्रेस आघाडीच्या अनेक बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपने हे सरकार स्थापन केले. नंतर बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक लढवली आणि जिंकली. सध्याच्या विधानसभेत भाजपचे 121 आमदार आहेत. काँग्रेसकडे 70 आणि जेडीएसकडे 30 आमदार आहेत. भाजपनेही आपल्या कार्यकाळात मुख्यमंत्री बदलले. बी.एस. येडियुरप्पा यांनी जुलै 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना सिंहासनावर बसवण्यात आले.

अशी आहे निवडणुकीची तैयारी…कर्नाटकात 58,282 मतदान केंद्रे आहेत, त्यापैकी 20,866 शहरी केंद्रे आहेत. यापैकी 50 टक्के मतदान केंद्रांवर म्हणजे 29,140 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाईल.1,320 मतदान केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी उपस्थित राहतील. यासोबतच 240 मतदान केंद्रांना मॉडेल मतदान केंद्र बनवणार. तरुणांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी 224 मतदान केंद्रे केवळ तरुणांकडूनच चालवली जाणार आहेत.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज छाननी तारीख – 21 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – 24 एप्रिल 2023
मतदानाची तारीख -10 मे 2023
मतमोजणीची तारीख – 13 मे 2023

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, आम्ही कर्नाटक विधानसभेसाठी मतदानाचा दिवस बुधवार ठेवला आहे. यामुळे लोकांना बाहेर पडता येणार नाही, कारण दोन दिवस सुटी मिळणे थोडे कठीण होणार आहे. लोक मतदानासाठी येतील. विधानसभा निवडणुकीसाठी 13 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असून, 24 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटकातील 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि दिव्यांग मतदारांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध असेल.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: