SBI मध्ये सहज नोकरी मिळण्याची ही शेवटची संधी…लवकरच करा अर्ज…उद्या शेवटची तारीख

न्यूज डेस्क – आजच्या युगात, कुठेही नोकरीसाठी अर्ज करतांना उमेदवारांना त्यांच्या अनुभवाबद्दल प्रथम विचारले जाते, अशा परिस्थितीत तुम्हाला देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये अप्रेंटिस साठी आमंत्रित करीत आहे. यामध्ये काम शिकण्याची संधी मिळेल सोबत पैसाही…तर आजच अर्ज करून आपली जागा निश्चित करा कारण उद्या शेवटची तारीख आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 6100 अ‍ॅप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 6 जुलै रोजी सुरू झाली होती आणि लवकरच संपेल. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन या पदांवर भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची तारीख 26 जुलै रोजी संपेल

एसबीआयमध्ये 6100 अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख लवकरच संपेल. अधिकृत अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवार 26 जुलै 2021 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करताना जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 300 रुपये अर्ज भरावे लागतील, तर उर्वरित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रताः
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही प्रभागातील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येईल.

आपण एका वर्षासाठी एसबीआयमध्ये काम शिकू शकता
प्रशिक्षुपदाच्या या पदांवर यशस्वी झालेल्या उमेदवारांना एसबीआयकडे एक वर्षाच्या कालावधीत काम करण्याची संधी मिळते. या दरम्यान या उमेदवारांना दरमहा 15,000 रुपये वेतनही मिळते. ही पूर्णवेळ नोकरी नसली तरी एसबीआयमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छुकांना बँकेत लिपीक पदावर भरतीसाठी असलेल्या परीक्षांमध्ये प्राधान्य दिले जाते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here