नाभिक समाजात पहिलेदांच हा सुवर्ण दिन आला…

पालघर – भरत दुष्यंत जगताप

महाराष्ट्रात पहिल्यांदा जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने सलून व्यवसायीकांना सलून खूर्ची वाटप कार्यक्रम आदरणीय उदयभाऊ सांगळे यांच्या संकल्पनेतून सिन्नर येथे भव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला तात्कालिन आमदार राजाभाऊ वाजे,

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शितलताई सांगळे,आपले राष्ट्रीय अध्यक्ष श्री भगवानराव बिडवे,सिन्नरचे बहूतांश नगरसेवक व सिन्नर तालुक्यातील व शहरातील नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच दिवशी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम पण होता तो ही सोहळा उत्साहात पार पडला.

त्यानंतर खूर्ची वितरणाचा दिमाखदार कार्यक्रम झाला यावेळी श्री भगवान आण्णा बिडवे म्हणाले की आम्ही हा सिन्नर पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रात राबवू व संपूर्ण राज्यातील नाभिक बांधवांना याचा फायदा देवू.परंतू या योजनेत राजकरण येऊन ही योजना बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परंतु ही योजना पूर्ण महाराष्ट्रात चालू रहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहेया साठी सर्व नाभिक बंधूनी एकजूट करावी .अशी ही सूंदर योजना ऊदयभाऊंना हाताशी धरून सिन्नर तालुक्यात यशस्वी पणे राबवणारे दोन शिलेदार सलून असोसिएशनचे सिन्नर तालुका अध्यक्ष संदीप व्यवहारे व वाल्मिक शिंदे यांचे सवॆ समाजाच कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here