या मुलीने ३० फूट खोल पाण्यात केले ३ मिनिटे नृत्य…ही आहे जलपरी..!

न्यूज डेस्क :- या जगात असे बरेच लोक आहेत जे आपल्या कौशल्याने प्रत्येकाला चकित करतात. प्रत्येकाची स्वतःची वेगळी प्रतिभा असते. काहींना नाचणे आवडते, काहींना गाणे पसंत आहे, काहींना चित्रकला आवडते तर काही लोकांना स्वयंपाक करणे आवडते.स्पेनमधील एरिदना हाफिजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एरिअद्ना हाफिज व्यवसायाने नृत्यदिग्दर्शक आहे.

10 मीटर किंवा 30 फूट खोल पाण्यात जाऊन टांगो चित्रपटासाठी एरिअदना हफिजने एक सनसनाटी नृत्य सादर केले. या चित्रपटाच्या निर्मात्या बस्टियन सॉइलने एरिअदना हफीजच्या डान्सचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि त्याविषयीची माहितीही शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये एरियडना हाफिज पाण्याखाली नाचताना दिसत आहे. त्यांचे पॉप पाण्यामध्ये इतके स्पष्ट आहे की प्रेक्षक आश्चर्यचकित होतील. 3 मिनिटांचा हा डान्स पाहून तुम्हीही त्यांच्या फॅन व्हाल.

एरियडना हाफिजचा हा डान्स व्हिडिओ लोकाना खुप आवडला आहे.17 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पहिला आहे. एरियडना हाफिज एक अंडर वॉटर मॉडेल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here