या शेतकऱ्याने चक्क शेतात लावले सनी लिओनीचं बोल्ड पोस्टर…कारण वाचून हैराण व्हाल

फोटो- सौजन्य Twitter

न्यूज डेस्क – सोशल मिडीयावर सध्या एका पोस्टरची चर्चा जोरात सुरु आहे ती म्हणजे एका शेतकर्याने आपल्याशेतात लावलेलं सनी लिओनीचं बोल्ड पोस्टर. आंध्र प्रदेशमधील नल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात सनीचे दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावल्याचं बातमी समोर आली आणि सगळीकडे या पोस्टर्सचे फोटो व्हायरल झाले.

शेतकऱ्याने आपल्या शेतात जसे बुजगावणे लावतात त्याच प्रमाणे हे पोस्टर दोन ठिकाणी पोस्टर लावले असून नेमक याच कारण काय आहे ते पाहूया, या पोस्टरमध्ये सनी ही लाल रंगाच्या बिकीनीमध्ये दिसत आहे. तसेच या पोस्टरवर तेलगू भाषेत एक ओळ लिहिण्यात आलीय. या ओळीचं भाषांतर, “माझ्यासाठी रडू नका किंवा माझा मत्सर करु (जेलस वाटून घेऊ) नका.” आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शेतकऱ्याने सनीचा हा असा पोस्टर आपल्या शेतात का लावलाय.

तर यामागेही एक वेगळंच लॉजिक आहे. आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाला लोकांची नजर लागू नये म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि शेतातील मालाऐवजी या पोस्टरकडे आधी नजर जावी म्हणून हा पोस्टर शेतात लावण्यात आलाय.

सनीचं हे पोस्ट लावणाऱ्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी. “या वर्षी माझ्या १० एकर शेतामध्ये मला चांगलं उत्पन्न मिळालं आहे. मात्र यामुळे गावातील तसेच या शेताच्या बाजूने जाणाऱ्यांमध्ये माझ्या शेतातील शेतमालाची चर्चा रंगलीय. त्यामुळेच या लोकांची नजर लागू नये म्हणून मी सनी लिओनीचं मोठं पोस्टर शेतामध्ये लावलं.

माझ्या या ट्रीकचा फायदा झाला असून आता माझ्या शेतातील शेतमालाकडे कोणी पाहत नाही,” असं अक्कीनापल्ली म्हणालेत. म्हणजेच त्यांनी सनीच्या या पोस्टरचा वापर बुजगावण्यासारखा केलाय. मात्र बुजगावणी ही पक्षांना घाबरवून पळून लावण्यासाठी असतात. इथे सनीचं पोस्टर हे लक्ष वेधून घेण्यासाठी लावण्यात आलं आहे. म्हणजेच शेतातील शेतमालावर लक्ष जाण्याआधी सर्वांचं लक्ष आधी या पोस्टरकडे जात आहे.

पोलीस आणि कृषी अधिकाऱ्यांना हे पोस्टर आक्षेपार्ह वाटलं नाही का यासंदर्भात बोलताना अक्कीनापल्ली यांनी आपण कोणत्याची कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असं सांगतात. “आम्हाला शेतीमध्ये काय अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी कधी अधिकारी आमच्या शेताच्या बांधावर आले नाहीत. त्यामुळे त्यांना या पोस्टरबद्दल काही आक्षेप असण्याचं कारण दिसत नाही,” असं अक्कीनापल्ली यांनी सांगितलं आहे.

दरम्यान या पोस्टरमुळे पुन्हा चर्चेत आलेली सनी लवकरच ‘रंगीला’ आणि ‘शेरो’ या मल्याळम चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here