“या” क्रिकेटर मारलेल्या उतुंग षटकाराने पार्किंग मधील स्वत:च्या गाडीचा काच तोडला…

क्रिकेट न्यूज – म्हणतात ना क्रिकेट काहीही होऊ शकते ! तर गुरुवारी क्रिकेटचा सामना संपल्यानंतर एक विचित्र घटना समोर आली.आयर्लंड संघाचे अष्टपैलू केविन ओब्रायनने त्या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली. केविन ओब्रायनने धमाकेदार डाव खेळत सर्वांची मने जिंकली पण जेव्हा तो घरी जाण्यासाठी बाहेर आला आणि गाडी पाहिली तेव्हा त्याचे होश उडाले. केव्हिन ओब्रायनने मारलेल्या उतुंग षटकाराने त्याच्याचा कारचा मागील काच चकनाचूर झाला होता.

आयरिश अष्टपैलू गुरुवारी आंतर प्रांतीय मालिका सामन्यासाठी खेळत होता. या सामन्यात केव्हिन ओ ब्रायनने ३७ चेंडूत ८२ धावांची तुफानी खेळी केली. या डावात केविन ओ ब्रायनने ८ लांब षटकार ठोकले. दरम्यान, त्याच्या आठ षटकारापैकी एकाने इतक्या लांब पल्ल्यात पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारच्या काचेचे तुकडे तुकडे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेच या घटनेचा उल्लेख केला आहे.

पेमब्रोक क्रिकेट क्लब येथे हा सामना खेळल्या जात होता, ज्यात आयर्लंड संघाचा सुप्रसिद्ध फलंदाज केविन ओब्रायन देखील खेळत होता. ओब्रायन यांच्या कारची काचा फोडल्याची बातमी सोशल मीडियावर आल्यामुळे डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात हेडलाइन्स बनले. केव्हिन ओ ब्रायन यांच्या घरेलू संघ लेन्स्टर लाइटनिंगसाठी टी -२० सामने खेळत होता

आयरिश क्रिकेटपटू केविन ओ ब्रायन आपल्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, पण क्लब क्रिकेटमुळे हा सामना मुख्य बातमी ठरला नाही. आयर्लंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावणाऱ्या केव्हिन ओ ब्रायनला विश्वचषक २०११ च्या सामन्यात सर्वाधिक ख्याती मिळाली ज्यामध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध तुफानी शतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here