यवतमाळ धान्य चोरी करणारे चोर गजाआड…

यवतमाळ – सचिन येवले

चोरी केलेले धान्य घेवून विक्रीसाठी यवतमाळातील टांगा चौकात आलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली.ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. चोरट्यांकडून तब्बल 24 गुन्हे उघडकीस आले.

सय्यद जुबेर सय्यद ताहेर (रा. आर्णी), लल्ला उर्फ ललित चव्हाण (रा. दिग्रस) हे दोघे धान्यविक्रीसाठी यवतमाळात आल्याची टीप पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. विश्‍वासात घेवून विचारपूस केली.

सय्यद मुबारक सय्यद मुजफ्फर (रा. दारव्हा), शेख समीर शेख रहीम यांच्यासह मिळून आर्णी, दिग्रस, दारव्हा, पारवा, लाडखेड परिसरात किराणा दुकान, गोदाम फोडले. त्यातून अन्नधान्य, किराणा साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 24 गुन्हे उघडकीस आणले. चोरट्यांकडून पाच लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here