तेल्हारा तालुक्यातील सेंट्रल बँक शाखा उकळी बाजार येथे चोरट्यांनी खिडकी तोडून तिजोरी फोडली…

तेल्हारा – चेतन दही सह गोकुळ हिंगणकर

पोलीस स्टेशन तेल्हारा हृददीमधील ग्राम उकळी बाजार ता. तेल्हारा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा उकळी बाजार च्या दि.०८/०२/२०२२ रोजी वे रात्रीदरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी मागिल लाकडी खिडकी उपटून वर करून बँकेत प्रवेश करून बँकेतील लॉकर गॅस कटरने कापून लॉकरमधील रोख ८,६४,८५०/ रू चोरून नेले आहेत.

तरी सदर प्रकरणात पो.स्टे. तेल्हारा येथे अप नं. ५९ / २०२२ कलम ४६१,३८० भादंवि प्रमाणे आजरोजी दाखल करण्यात आला आहे. या मध्ये तिन आरोपिंदा सामावेश आहे असे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.सदर च्या घटनास्थळी मा. पोलीस अधिक्षक जि. श्रिधर उपविभागिय पोलीस अधिकारी रितू खोकर मॅडम, पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. संतोष महल्ले, सपोनि ज्ञानोबा फड यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनास्थळी श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ, तपास वाहन यांना तपासकामी पाचारण करण्यात आले होते.

आरोपिंचा शोध घेणेकामी व तपास कामी पथके गठीत करून तपासकामी खाना करण्यात आले आहेत. तसेच सदर तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व सायबर शाखा, अकोला समांतर तपास करत आहे.मा. पोलीस अधिक्षक जी. श्रिधर साहेब मा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती मोनीका राउत मॅडम अकोला, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी अकोट रिंतु खोकर मॅडम उपविभाग अकोट पोलीस निरीक्षक स्था. गु. शा. संतोष महल्ले यांचे मार्गदर्शनात पुढील तपास ठाणेदार ज्ञानोबा फड करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here