डोंगरशेवली परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट…

चिखली :- राहुल गवई
चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथे चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून गावात व आजूबाजूच्या परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
याबाबत सविस्तर असे की, किनोळा रोडला लागून असलेल्या गणेश सावळे यांच्या घराच्या समोरील ओट्यावरून काल रात्री हरभऱ्याचे सहा पोते चोरट्याने चोरून नेल्याची

घटना घडली. गणेश सावळे हे आपल्या शेतामध्ये गेल्या चार वर्षापासून राहतात त्यांच्या शेतीचा संपूर्ण माल हा त्यांच्या घराच्या समोरील ओट्यावरच असतो हे सर्व हेरून व मध्यरात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांनी सहा हरभऱ्याचे पोते अंदाजे किंमत 50 हजार रुपयांचा माल चोरून नेला.


परिसरातील ही तिसरी घटना असून चार दिवसापूर्वी एका शेतकऱ्याची म्हैस चोरून नेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. या परिसरात वारंवार अशा चोरीच्या घटना घडत आहेत. या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असा सूर गावकरी मंडळी कडून निघत आहे. पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here