पेंच येथे निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांचे होणार श्रेणीकरण…

सिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी पर्यटन गेट वरील गाईड्सची सभेला उपस्थिती…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर येथे पर्यटन बाबत सुधारणा होत असून मागील काही वर्षात येथे पर्यटकांची चांगलीच वर्दळ होत आहे. पर्यटक यांनी दिलेल्या प्रतिसादातून निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांच्यात त्यांचे ज्ञान, अनुभव, बोलण्याची शैली या सारख्या बाबींचा विचार करून यावर्षीच्या पर्यटन मौसमापूर्वी श्रेणीकरण करण्याचे ठरवले आहे.

यासाठी आज पेंच मधील सिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, खुबाळा, कोलीतमारा व सुरेवणी या सर्व पर्यटन गेट वरील गाईड्स यांची अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपसंचालक प्रभूनाथ शुक्ल यांचे अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.

यावेळी सहा. वन संरक्षक अतुल देवकर यांनी श्रेणीकरण व त्याअनुषंगाने प्रशिक्षण बाबत पेंच प्रशासनाची भूमिका मांडली. यास सर्व निसर्ग पर्यटक मार्गदर्शक यांनी सहमती दर्शवली व या प्रस्तावाचे सकारात्मक स्वागत केले. तसेच सभेत प्रत्येक गेट वरील पर्यटन बाबत समस्या व उपाययोजना बाबत त्यांची मते जाणून घेण्यात आली. सदर सभेत उपसंचालक प्रभुनाथ शुक्ल यांनी पेंच मधील पर्यटन व्यवस्थापन व अनुषंगिक सुधारणा तसेच प्रशिक्षण शिबिर आयोजनाची माहिती दिली.

सदर सभेत वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे यांनी गेट व्यवस्थापनाची माहिती दिली. सभेसाठी , वन पाल डोंगरे, वनरक्षक आकांक्षा चवडे तसेच गाईड संघटनेचे अध्यक्ष चंपालाल डोंगरे व इतर सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here