प्रशासनासह सरकारमध्ये ताळमेळ नाही – आम.गोपिचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे

काही दिवसापुर्वीच आरोग्य विभागानं कोणतीही पुर्वसुचना न देता आपली परिक्षा रद्द केली होती. कोरोनाच्या संकटात, विद्यार्थी कसे तरी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते त्यांना माघारी पाठवलं होतं सरकारी भरतींच्या परिक्षांमध्ये सावळा गोंधळ घालण्याची सवयच या सरकारला जडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षाही यांनी सहा वेळा पुढं ढकलली होती. विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत.

याचं गांभीर्य सरकारला नाही.अशी प्रतिक्रिया आमदार गोपिचंद पडळकर यांनी आज व्यक्त केली आहे.प्रशासनात आणि सरकारमध्ये कसलाच ताळमेळ नाही. इतकं होऊन पुन्हा नव्या होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या तारखेत गोंधळ घातलाय. एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे सरकार विद्यार्थ्यांचा परिक्षांना सामोरं जाण्याचा अधिकारच नाकारत आहे.

एकतर हे वसुली सरकार नोकर भरती काढत नाही, काढली तर असा गोंधळ घालतं. सरकारच्या या गलथान कारभारामुळे स्वप्नील लोणकर सारख्या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला, पण या प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वावरतंय.असा टोला आम.पडळकर यांनी लगावलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here