कवी आणि समाज यांच्यात साहित्यिक करार असतो – डॉ. शैलेंद्र लेंडे…

रामटेक – राजु कापसे

विद्यासागर कला महाविद्यालय आणि महात्मा गांधी महाविद्यालयात मराठी- इंग्रजी विषयाचे राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न.विद्यासागर कला महाविद्यालय, खैरी (बिजेवाडा ) रामटेक आणि महात्मा गांधी महाविद्यालय, पारशिवनी येथील मराठी व इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने ” कोविड काळातील साहित्य आणि संस्कृती ” या समकालीन ज्वलंत विषयावर ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यासागर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. के. यू.पिल्लई यांनी आपल्या उदघाटनीय भाषणातून चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका विशद केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर विभागातील माजी विभागप्रमुख प्राद्यापक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी ” कोविड काळातील साहित्य आणि संस्कृती ” या समकाळातील समाजातील प्रत्येक घटकांवर प्रभाव पाडणाऱ्या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले .कोरोनाकाळाच्या उदरातील प्रश्न अत्यंत भयावह आहेत.

मूल्यांवरचा विश्वास उडत चाललेल्या काळात आपण जगतोय.कवी आणि समाज त्यांच्यात साहित्यिक करार असतो .कोविड काळातील साहित्य हे बाळबोध प्रकारचं साहित्य आहे .असे महत्वपुर्ण विधान त्यांनी केले.त्याचप्रमाणे रातुम नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजय पळवेकर यांनी इंग्रजी भाषेतून समकालीन कोविडने प्रभावित झालेल्या साहित्य आणि संस्कृती या विषयाच्या अनुषंगाने मार्मिक व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

या एक दिवसीय चर्चासत्राच्या सफल आयोजनासाठी म. गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. जाधव , मराठी विभागप्रमुख डॉ. राकेश कभे , इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.प्रमोद गोरडे , प्रा. महेश चोंदे ,यांनी सहकार्य केले . मुख्य अतिथींचा परिचय प्रा. रवींद्र पानतावणे यांनी करून दिला.

चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी केले. आभार डॉ. गिरीश सपाटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यासागर महाविद्यालयातील तसेच म. गांधी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद , शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी प्रयत्न केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here