१० वी पास असाल !…तर भारतीय नौदलाच्या या पदासाठी अर्ज करू शकता…७० हजार मासिक वेतन मिळवा

फोटो गुगल

न्यूज डेस्क – आपण दहावी पास आहात आणि सरकारी नोकर्‍या शोधताय ? सैन्यात सेवा करण्याचे आपले स्वप्न आहे का? जर होय तर हि बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आम्ही आपल्याला दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या सरकारी नोकरीसाठी अर्ज केला जाऊ शकतो, याबाबत माहिती देणार आहोत.

जर आपण दहावी उत्तीर्ण केली असेल तर आपण या दिवसांत 6 ऑगस्टपर्यंत भारतीय नौदलात संगीतकारांच्या पदांसाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वय श्रेणी:
भारतीय नौदलात MR पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 पर्यंत मोजली जाईल.

निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या आधारे केली जाईल, ज्यासाठी उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

निवडीनंतर किती पगार देण्यात येईल
या भरतीमध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना प्रारंभिक प्रशिक्षण कालावधीत दरमहा 14,600 / – रुपये मिळतील. यानंतर त्यांना डिफेन्स पे मॅट्रिक्स लेव्हल -3 अंतर्गत 21,700 रुपये – 69,100 रुपये दिले जातील.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here