कोगनोळी नजीकच्या करनूर फाट्याजवळ चोरी…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी ता.निपाणी येथील नजीकच असणाऱ्या कागल तालुक्यातील करनूर फाट्याजवळ व इंग्लिश मीडियम स्कूल शेजारील अफजल मुल्‍ला यांच्या कला फँब्रिकेशनस् वेल्डिंग वर्कशॉप मधील सुमारे जवळपास पंचावन्न हजाराच्या किमतीच्या यंत्रसामुग्रीची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की अफजल (गब्बर) मुल्‍ला हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी रात्री आपले वेल्डिंगचे काम आवरुन घरी गेले होते. मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अफजल मुल्ला यांच्या वेल्डींग दुकान मधील एक वेल्डिंग मशीन, एक ऑर्गन वेल्डिंग मशीन आणि एक कटर मशीन असे जवळपास 55 हजार रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी करून चोर पसार झाले.

येथून हाकेच्या अंतरावर घटना स्थळाच्या दक्षिण बाजूस कोगनोळी आउट पोस्ट पोलीस स्टेशन असताना देखील चोरांनी एकदा नाही तर यापूर्वी देखील गेल्या वर्षी सुद्धा सदर दुकानांमध्येच चोरी केलेली होती.

सदर घटना वेल्डिंग मालकांने पोलिसांना सांगुन या चोरीच्या घटनेचा तपास करण्याची मागणी केल्याचे समजते. नजीकच असणाऱ्या बोगदा परिसरात अंधाराच्या साम्राज्याचा फायदा घेऊन चोरांनी सदर दुकानांमध्ये चोरी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here