कोगनोळीत किराणा स्टोअर मध्ये चोरी…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील बाजारपेठ लगत असणाऱ्या मुख्य रस्त्यावर येथील अरिहंत किराणा स्टोअर मध्ये चोरी झाल्याची घटना शनिवारी दिनांक 24 रोजी उघडकीस आली.

यामध्ये सदर अज्ञात चोरट्यांनी तीन तेलाचे मोठे डबे ,दोन तांदळाची पोती आणि जवळपास सहाशे रुपयांची चिल्लर अशी मुद्देमाल दुकानाच्या बंद शटरची ताळे तोडून चोरून नेल्याची माहिती घटनास्थळावरून मिळालेली आहे.

चोरी झालेले सदर किराणा स्टोअर येथील महावीर चौगुले यांचे अरिहंत किराणा स्टोअर म्हणून ओळखले जाते. ही घटना घडल्यानंतर पोलिसांना कळवले असता या ठिकाणी तात्काळ कोगनोळी आऊटपोस्टचे पी एम घस्ती आणि बीट हवलदार राजू गोरखनावर यांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना समजताच माजी मंत्री वीरकुमार पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .व सर्वांनी सावधान राहण्याचे अहवान त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here