पातूर येथे पुन्हा चोरी…पातूर पोलीस कुंभकरणी झोपेत…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरात चोऱ्याचे सत्र सुरु झाले असून शनिवारी मुजावर पुरा, व शनिवार पुरा येथे एकाच रात्री चोऱ्या करून चोरट्यानि अंदाजे एक लाख रुपयाचि चोरी केली होती या प्रकरणाचि शाई वाळत नाही तोच काल रात्री पुन्हा चोरट्यानि किराणा दुकानात शिरून अंदाजे पन्नास हजार रुपयाचि चोरी झाल्याचि घटना,

आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी उघडकीस आली याबाबत सविस्तर वृत्त असे कि बाळापूर रोड वरील वसंतराव नाईक विद्यालया बाजूने असलेल्या सद्गुरू सेवा किराणा हे दुकान मगनलाल बगडेकर यांचे असून,

त्यांनी 8 सप्टेंबर रोजी नेहमी प्रमाणे आपले किराणा दुकान रात्री बंद केले असता आज सकाळी ते दुकान उघडन्यास गेले असता त्यांना दुकानाचे शटर हे उघडे दिसून आले असता त्यांनी दुकानात पाहिले असता दुकानात ठेवलेले रोख १९८०० रुपये व किराणा दुकानातील तेला चे डब्बे, काजू, बदाम, अक्रोट, आदी सामान किंमत 25 हजार असा एकूण अंदाजे पन्नास हजार रुपया चि चोरी करण्यात आली असून,

दुसरी चोरी पातूर अकोला रोडवर असलेल्या पि. स. ट्रेडर्स या दुकानाचे शटर तोडून चोरटे आत घुसले मात्र चोरट्याना तिथे काहीच मिळून आले नाही त्यामुळे पि. स. ट्रेडर्स चे संचालक प्रशांत म्हैसने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही तर बगडेकर यांच्या तक्रारी वरून चोरी चि तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहे.

गेल्या पाच दिवसात शहरातील हि एकूण चौथी चोरी असून पातूर पोलीस मात्र कुंभकरणी झोपेत आहे का असा सवाल नागरिक करीत असून पातूर पोलीस पेट्रोलिंग च्या नावाखाली झोपा काढत असल्याचा सुद्धा आरोप नागरिक करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here