नाट्य चित्रगृहे खुली करण्याच्या निर्णयाचे मिरजेतील सप्तरंग सहयोगी कला मंच आणि नाट्यागण मिरज या संस्थेच्या रंगकर्मींच्या वतीने स्वागत…

सांगली – ज्योती मोरे

राज्यातील सर्व नाट्यगृहे आणि चित्रपट गृहे खुली केली त्या पार्श्वभूमीवर आज मिरजेतील रंगकर्मीनी आनंद व्यक्त करत येथील बालगंधर्व रंगमंदिर आणि देवल चित्र मंदिर येथे नटराज, रंगभूमी बालगंधर्व यांच्या पुतळ्याचे स्वच्छता आणि पूजन केले त्यानंतर सर्वांनी नमन नटवरा हि नांदी म्हणली तसेच देवल चित्र मंदिर येथे प्रोजेक्टरचे पूजन केले.

बालगंधर्व नाट्य गृह आणि देवल सिनेमा गृह च्या कर्मचार्‍यांना आणि देवल चित्र मंदिर येथील प्रेक्षकांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या. यावेळी नाट्य परिषद मिरज शाखा कार्यवाह ओंकार शुक्ल बाळासाहेब बरगाले, प्रशांत गोखले, विकास कुलकर्णी, कविता घारे -बागलकोटे, विनायक इंगळे राजन काकीर्डे, प्रकाश आहिरे, ऋषिकेश कुलकर्णी चंद्रकांत देशपांडे adv पूजा शिंगाडे दिगंबर कुलकर्णी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here