नाट्यगृह त्वरित सुरू करा, राज्य नाट्य स्पर्धा जाहीर करा…भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन…

सांगली – ज्योती मोरे

माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कलाकारांना पाच नोव्हेंबर रोजी नाट्यगृह सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु नाट्यगृह त्वरित सुरू करावीत. मागील वर्षी न झालेल्या राज्य नाट्य स्पर्धा सुरू करून,ती त्वरित जाहीर करावी. की जेणे करून हौशी संस्थाना तालीम सुरू करता येईल. अशी मागणी भाजप सांस्कृतिक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ओंकार शुक्ल यांनी केलीय.

संगीत गाण्यांच्या मैफिली, तमाशा, शाहिरी, लोकनाट्य यासह सर्व सांस्कृतिक आणि कलेचे कार्यक्रम गणेशोत्सवा पासून सुरू व्हावेत, सर्व कलाकारांना कोरोणामुळे आर्थिक मदत करावी, वृद्ध कलाकार आणि पश्चात असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना वाढिव मानधन मिळावे, अशा मागण्यांचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांना आज भारतिय जनता पार्टी च्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीने देण्यात आले.

ओंकार शुक्ल

यावेळी ज्येष्ठ लेखक राम कुलकर्णी, पाश्चिम महाराष्ट्र सदस्य सौ माणिक जोशी, जिल्हा प्रमुख अपर्णा गोसावी, गोवर्धन हसबनीस, सचिन पारिख, दिगंबर कुलकर्णी, रश्मी सावंत, अनुजा कुलकर्णी, सायली हिप्परगी, नीलेश साठे, अनघा कुलकर्णी देवदत्त पेशकर, आर्टिस्ट असोसिएशनचे अतूल शहा, अँड पूजा शिंगाडे, जानकी जोशी, किरण ठाणेदार, बाजीराव कोपार्डे, मानस जोशी, भास्कर कुलकर्णी, नम्रता साठे आदि रंगकर्मी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here