जांभळी येथील तरूणांनी घडवले माणुसकीचे दर्शन…

सांगली – ज्योती मोरे

आजकालचा युवक हा वाया गेलेला आहे,व्यसनी आहे, त्याच्या ह्रदयात मायेचा झरा नाही. असं म्हटलं जातं.पण शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील तरुणांनी मात्र लोकांचा हा समज खोटा ठरवलाय.

जांभळी-टाकवडे मार्गावर रात्रीच्या सुमारास गावातील काही तरुणांना एक निराधार व्यक्ती आढळून आली. येथील युवासेना शहराध्यक्ष, ऋषिकेश माळी, विशाल गायकवाड, ऋषिकेश भगत, अनिकेत जाधव आदी युवकांनी या व्यक्तीची आपुलकीने विचारपूस केली असता, ही व्यक्ती कर्नाटकातील विजापूर येथील असल्याचे समजले.

या तरुणांनी माणुसकीचे दर्शन घडवत या व्यक्तीची गावातील शाळेमध्ये राहण्याची आणि जेवणाखाण्याची सोय करुन, इचलकरंजीमधील माणुसकी फौंडेशनला याबाबतची माहिती दिली. आज या व्यक्तीला माणूसकी फौंडेशनच्या ऋषिकेश चव्हाण यांनी उपचारासाठी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सामाजिक बांधिलकी दाखवत माणूसकी जपण्याचं पवित्र कार्य केल्याबद्दल या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here