कोगनोळी हंचिनाळ मार्गावरील खड्डे मुजवण्याचे काम सुरू…

बेळगाव – राहुल मेस्त्री

बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी ते हंचिनाळ गावा पर्यंतच्या रस्त्याची अवस्था गेल्या काही महिन्यापासून अत्यंत बिकट झाली आहे. यामार्गावर दुचाकी ,तीन चाकी आणि चार चाकी वाहन धारकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तर अनेक वाहन धारक आपला जीव मुठीत ठेवून गाडी चालवत असतात याचेच गांभीर्य विचारात घेऊन.चिक्कोडी लोकसभा मत क्षेत्राचे खासदार आण्णासाहेब जोल्ले आणि कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री सौ.शशिकला जोल्ले यांच्या विषेश प्रयत्नातून कोगनोळी ता.निपाणी येथील कोगनोळी ते हंचिनाळ मार्गावरील खड्डे मुजवण्याचे काम आमदार फंडातून सुरू केले आहे.

यामुळे येथील वाहन धारकांना थोडा दिलासा मिळाला असे म्हणावे लागेल… तर हा कोगनोळी-हंचिनाळ मार्ग येत्या नोव्हेंबर महिन्यात नव्याने होणार असल्याची माहिती निपाणी ग्रामीण भाजप सदस्य सुनील माने यांनी दिली.यावेळी कोगनोळी भाजप प्रमुख कुमार पाटील, विलास नाईक, कुमार व्हटकर, नामदेव यादव, तौसिफ मुल्ला,अमित गायकवाड, प्रकाश पोवार, प्रितम शिंत्रे, वैभव पाटील, विजय पाटील, बबलू पाटील, मोहन विटे,सचिन निकम आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here