महिलेचे धाडस…चक्क ६ सिंहीणींच्या पाठीमागे चालत गेली…पाहा धक्कादायक व्हायरल Video…

फोटो -Video स्क्रीन शॉट

न्युज डेस्क – 6 सिंहीणींच्या मागे मागे एक महिला जात असल्याची धक्कादायक क्लिप एका इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. त्यांच्या मते ही क्लिप आफ्रिकेतील केनियाची आहे. मात्र व्हिडीओतील महिला कोण आहे आणि हा व्हिडीओ कधी चित्रित करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही.

सिंह म्हणजे जंगलाचा राजा. ज्याच्याकडे जाण्याचे धाडस मोठे प्राणी करत नाहीत. सिंह गर्जना करतो तेव्हा कित्येक किलोमीटर दूर चालणारे प्राणीही सावध होतात. पण एक महिला आहे जिने एक-दोन नव्हे तर सहा सिंहांसोबत फिरतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. आता ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. महिलेचा आत्मविश्वास पाहून लोकांना आश्चर्य वाटते. काहींना प्रश्न पडतो की, ती स्त्री 6 सिंहीणी सोबत इतक्या आरामात कशी फिरत आहेत?

या व्हिडिओमध्ये तुम्ही एक महिला जंगलात 6 सिंहीणींच्या मागे फिरताना पाहू शकता. सिंहीणीसोबत फिरताना व्हिडीओसाठी ती फोटोग्राफरला पोज देतानाही दिसत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या महिलेच्या चेहऱ्यावर भीतीची किंचितशी सुरकुतीही नाही. चेहऱ्यावर फक्त हास्य आणि आत्मविश्वास आहे. त्यामुळेच ती सिंहिणीची शेपटीही सहज पकडते. मात्र, तरीही सिंहीणी तिला काहीच करत नाही.

हजारो वेळा पाहिली ही क्लिप

सफारीगॅलरी नावाच्या हँडलवरून ही धक्कादायक क्लिप इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. त्याच्या मते हा व्हिडिओ आफ्रिकेतील केनियाचा आहे. मात्र व्हिडीओतील महिला कोण आहे आणि हा व्हिडीओ कधी चित्रित करण्यात आला याची पुष्टी झालेली नाही. मात्र ही क्लिप इंटरनेटवर वेगाने पसरत आहे. आता पर्यंत 1.50 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here