महिलेच्या पोटातील ५ कीलो चा गोळा काढून महिलेला दिले नवजीवन…

डॉक्टर रविंद्र साबळे यांचे नातेवाइकांकडून कौतुक…

दर्यापूर – किरण होले

मूर्तिजापूर तालुक्यातील अंदुरा येथील ३८ वर्षीय महिला ज्योती मिलिंद नाईक यांच्या पोटातून गेल्या एक वर्षापासून त्रास सुरू होता . रुग्णांचे नातेवाईक हे उपचार घेण्यासाठी अमरावती अकोला मुर्तीजापुर व अन्य ठिकाणी बरेच वेळा चक्रा मारल्या परंतु कुठेही रुग्णांना उपचार होऊ शकला नाही.

अखेर रुग्णांच्या नातेवाईकांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे नवजीवन हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी सांगण्यात आले. रुग्णाला 8 जून रोजी नवजीवन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. सर्वप्रथम रुग्णाची सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये रुग्णाच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले. नंतर डॉक्टर रवींद्र साबळे यांनी त्वरित परतवाडा डॉक्टर सुरेंद्र बरडिया यांना उपचार करण्यासाठी दर्यापूर येथे पाचारण करण्यात आले.

डॉक्टरांनी तात्काळ दर्यापूर येथे रुग्णालयात दाखल होत . रुग्णांची तपासणी केली नंतर ऑपरेशन करण्यासाठी नातेवाईकांना सांगितले नातेवाईकांनी सुद्धा ऑपरेशन करण्यासाठी होकार दिली. रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आला . तब्बल दोन तास रुग्णांवर उपचार करण्यात आला . व नंतर रुग्णाच्या पोटातून तब्बल पाच किलोचा गोळा काढण्यात आला रुग्णांची पक्कृती सुद्धा सुधारित आहे.

विशेष म्हणजे या रुग्णांवर बाहेर ठिकाणी लाखो रुपये खर्च येत होता मात्र डॉक्टर रवींद्र साबळे यांनी अगदी कमी रुपयात रुग्णांवर उपचार केले. विशेष म्हणजे एका तालुक्याच्या ठिकाणी एवढे मोठे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडल्याने डॉक्टरांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांची रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुक करण्यात आले. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर सुरेंद्र बरडिया , डॉक्टर रवींद्र सावळे, डॉक्टर माधुरी साबळे, डॉक्टर योगेश वानखडे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या रुग्णांवर उपचार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here