कोरोना योद्धा पेंटिंग स्पर्धेच्या विजेत्यांचा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे हस्ते गौरव…

दोन गटात एकूण ६ विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान

डेस्क न्युज – अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे संकल्पनेतून अकोला पोलीस तर्फे दिनांक 19।9।20 रोजी कोरोनाशी लढत असलेल्या करोना योध्यानचा सन्मान व्हावा व युवा चित्रकारांना त्यांच्या कलेतून करोना योध्यानचे चित्ररूपी कार्य सर्व समाजा समोर यावे म्हणून पोलीस मुख्यालयाच्या आवार भिंतीवर भव्य अशी करोना योद्धा पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते,

सदर स्पर्धेला ढोणे चित्रकला महाविद्यालय, रोटरी क्लब अकोला, दिव्यान्ग आर्ट गॅलरी, जे सी आय न्यू प्रियदर्शनी अकोला ह्या संस्थेची मदत झाली होती, ह्या मध्ये बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयाच्या एकूण 19 तरुण विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यांनी अतिशय सुंदर भित्ति चित्रे काढली होती,

त्याचे परीक्षण करण्यात येऊन दोन गटात एकूण 6 स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले तसेच दोन्ही गटात एका स्पर्धकाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले ,परितोषिका मध्ये सन्मान चिन्ह व प्रमानपत्राचा समावेश होता, गट क्रमांक एक मध्ये प्रथम पारितोषिक प्रतीक वाघ,

द्वितीय दीपाली वखारे, तृतीय रतन लोखंडे व उत्तेजनार्थ कल्याणी वर्मा हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर दुसऱ्या गटात प्रथम पूजा वानरे, द्वितीय हेमंत उपरिकर, तृतीय श्रद्धा जोध व उत्तेजनार्थ तुषार नकाशे ह्यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम,

रोटरी क्लब अकोला चे अध्यक्ष घनश्याम चांडक, प्रेम किशोर चांडक, प्रमोद कराळे, ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, जे सी आय न्यू प्रियदर्शनी अकोला च्या अध्यक्ष श्रीमती आरती पनपालिया ह्याचे प्रमुख उपस्थिती मध्ये प्रदान करण्यात आले तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले,कार्यक्रमाचे नियोजन व संचालन सदर प्रकल्पाचे प्रमुख शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here