कचरा फेकायला खिडकीतून खाली वाकला आणि थेट कचऱ्याच्या गाडीत जाऊन पडला…Video व्हायरल

न्यूज डेस्क – शहरांमध्ये जेव्हा कचरा गोळा करण्याची गाडी येते तेव्हा काहीजण घराच्या खाली उतरावं लागू नये यासाठी वरच्या मजल्यावरुन, किंवा खिडकीतून वगैरे कचरा फेकताना तुम्ही कधी बघितलं असेल. अशा लोकांना ‘धडा’ शिकवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घराच्या खिडकीत बसून कचऱ्याची गाडी घराखाली येण्याची वाट बघताना दिसतोय. थोड्यावेळात कचऱ्याची गाडी येताच तो खिडकीतून कचऱ्याची पिशवी गाडीत टाकण्याचा प्रयत्न करतो. पण, कचऱ्याची पिशवी फेकण्याच्या नादात त्याचाच तोल जातो आणि तो थेट कचऱ्याच्या गाडीत पडतो. हा व्हिडिओ भारतातीलच असल्याचं समजतंय, पण नेमका कोणत्या भागातील आहे हे मात्र समजू शकलेलं नाही. व्हिडिओ बघून नेटकऱ्यांना मात्र हसू अनावर झालंय. 

आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओबघून युजर्स मजेशीर प्रतिक्रियाही देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here