तवा येथील वझे दांपत्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी…

राहुल पाटील – पालघर

पालघर – डहाणू तील तवा येथील वझे दांपत्याची रवानगी अखेर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे . सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी तवा येथील विजय वझे आणि पत्नी स्मिता वझे यांच्या वर कासा पोलीस ठाण्यात 353, 332, 189 ,504 , 506 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कवडास धरण ते मीरा भाईंदर अस एमएमआरडीए च्या जलवाहिनीच काम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र हे काम तवा येथे सुरू असताना वझे दांपत्याकडून स्वतःच्या फायद्यासाठी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अनेक वेळा पोलिसांनी नोटीस देऊनही वझे दांपत्य काम करण्यास जाणाऱ्या एमएमआरडीए चे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसच दमदाटी करत होते.

गुरुवारी तवा येथे काम सुरू असतानाच या दोन्ही आरोपींनी या ठिकाणी जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली तसच कासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना धक्काबुक्की केल्याने अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एक दिवसाच्या पोलीस कोठडी नंतर या वीजय वझे आणि स्मिता वझे यांची रवानगी अखेर ठाणे कारागृहात करण्यात आली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here