अकोला जिल्हा परिषद सभापती पदाच्या निवडणूकितील खलनायक…

अकोला जिल्हा परिषद सभापती निवडणूक मध्ये पक्षाच्या उमेदवार सौ संगीता नंदकिशोर अढावू ह्यांना विषय समिती सभापती म्हणून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.महिला बाल कल्याण सभापती म्हणून सौ योगिता मोहन रोकडे ह्यांना उमेदवारी जाहीर करून दोन्ही उमेदवार ह्यांचे अर्ज गटनेते ज्ञानेश्वर सुलताने ह्यांनी भरले होते. योगिता रोकडे ह्यांचा अर्ज भरताना त्यांचे पती मोहन रोकडे ह्यांचे नाव गटनेत्यांनी “मोहोन” असे लिहिल्याचे पक्षाच्या नेत्यांचे लक्षात आले.

त्यामूळे तो अर्ज रद्द करून नवीन अर्ज सुलताने ह्यांचे कडून भरून घेण्यात आला. महिला बाल कल्याण सभापती साठी सौ योगीता रोकडे आणि विषय समिती सभापती पदासाठी सौ संगीता अढावू ह्यांचे परिपुर्ण अर्ज गटनेते ज्ञानेश्वर सुलताने ह्यांना दिले होते.त्यांचे सोबत दोन्ही उमेदवार तसेच सभापती आकाश सिरसाट, जि प सदस्य राम गव्हाणकर, जि प सदस्य सुनील फाटकर, जि प सदस्य शंकरराव इंगळे,

जि प सदस्या आम्रपालीताई खंडारे व त्यांचे पती अविनाश खंडारे, जि प सदस्या प्रगतीताई दांदळे आणि ज्यांना पक्षाने उमेदवार ह्यांचे सोबत सभागृहात जा असा आदेश दिला नव्हता, असे प्रा प्रसेनजीत गवई हे सुद्धा गेले होते.सभापती आकाश सिरसाट ह्यांचे बंगल्यावरून जिल्हा परिषद सभागृहात जाताना वाटेत गटनेता ज्ञानेश्वर सुलताने ह्यांनी चक्र फिरविली आणि सौ आढवू ह्यांचा उमेदवारी अर्ज चुकला आहे, नव्याने अर्ज घेऊन भरावे लागतील, अशी कोल्हेकुई सुरू केली.

त्यांचे सोबत असलेले जिल्हा परिषद सभापती आकाश सिरसाट आणि इतर जिल्हा परिषद सदस्य हे नवीन आणि अनुभव नसलेले होते.त्यामुळे त्यांनी गटनेत्यांनी केलेल्या दिशाभूलीस ते बळी पडले.आणि सभागृहात थेट नवीन अर्ज घेऊन प्रसेनजीत गवई ह्यांना दिले गेले.पक्षाने भरून दिलेला सौ संगीताताई आढावू ह्यांचा विषय समिती सभापती पदाचा अर्ज हा “सौ संगीता नंदकिशोर आढावू” असा भरला आहे.त्यांचे मतदार यादीत नाव “आढावू संगीता नंदकिशोर” असे आहे म्हणून नवीन अर्ज भरावा लागला, असा बनाव सुल्ताने ह्यांनी केला आहे.

जिल्हा परिषद निवडणूक नियमावली नुसार मतदार यादीतील लेखन दोषासाठी उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नाकारले जात नाही.(संदर्भ – महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १४ (४) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १६(३) किंवा उमेदवार अथवा सूचक यांच्या नावामधील तांत्रिक दोष किंवा मतदार यादीमधील नमूद केलेला चुकीचा अनुक्रमांक टाकला असेल अथवा अनुक्रमांक टाकला नसेल या एकमेव कारणावरून नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्याता येत नाही.

उमेदवाराने (संदर्भ – महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १९ व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १९ असा कायदा आहे.त्यामुळे सौ आढावू ह्यांचे नाव अर्जावर त्यांचे नाव “सौ संगीता नंदकिशोर आढावू” असले आणि मतदार यादीत “आढावू सौ संगीता नंदकिशोर ” असे असले तरी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला नसता.त्यामुळे गटनेते सुल्ताने ह्यांनी मोठा गेम केला आहे.

त्यांनी दुसरी बनवाबनवी केली की, जे उमेदवार होत्या सौ आढावू आणि सौ रोकडे त्यांचे नावाने उमेदवारी अर्ज आणले नव्हते तर ते अर्ज राम गव्हाणकर आणि गटनेते ह्यांचे नावावर आणलेले असल्याने नवीन उमेदवारी अर्ज घेतले.ह्यातला फोलपणा असा आहे की उमेदवाराचा सूचक हा उमेदवार ह्याचे वतीने उमेदवारी अर्ज आणू शकतो. एवढंच नव्हे तर उमेदवार सोबत नसेल तरी सुचक त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो.

त्याही पुढे जाऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा झाला तर सूचक हा देखील उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतो.त्यामुळे त्या दिवशी सभागृहात उमेदवार ह्यांचे नावाने अर्ज घेतले नाही आणि मतदार यादीत आणि अर्जावर त्यांचे नाव वेगवेगळे असल्याचा जो बनाव गटनेते सुलताने ह्यांनी केला आहे, ते एक सुनियोजित षडयंत्र आहे.तो एका कटाचा मोठा भाग आहे.

सौ संगीता आढावू ह्यांचा अर्ज विषय समिती साठी असताना प्रा प्रसेनजीत गवई आणि गटनेता सुलताने ह्यांनी त्याचा अर्ज महिला बाल कल्याण सभापती पदासाठी भरला त्यामुळे सौ रोकडे व सौ आढावू ह्यांचे दोन्ही अर्ज जाणीवपूर्वक महिला बाल कल्याण सभापती पदासाठी टाकण्यात आले.अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे अविरोध निवडून आले.

उमेदवारी अर्ज नव्याने घेऊन ते भरले जाणे, ह्या बाबत गटनेते सुल्ताने ह्यांनी एड बाळासाहेब आंबेडकर किंवा पक्षाच्या कोणत्याही नेत्याला फोन करून माहिती दिली ह्या मागे त्याचा हेतू काय हे स्पष्ट होते.गाडीत जाताना हा निर्णय ते स्वतः घेतात सभागृहात जाऊन अर्ज घेऊन भरतात परंतु पक्षाच्या कुणालाही ह्यांची माहिती दिली जात नाही.ह्यातून सुलताने ह्यांचा “खेळ” स्पष्ट होतो.

निवडणूक कायदा आणि त्यातील तरतुदी पाहता गटनेत्यांनी अपक्ष उमेदवार डोंगरदिवे ह्यांना अविरोध निवडुन येण्यासाठी पक्षातील त्याचे २५ वर्षाचे “राजकीय कसब” वापरून डोंगरदिवे ह्यांना उघड मदत केली आहे.ह्या फसवणुकीत त्यांना प्रा प्रसेनजीत गवई ह्यांनी विषय समिती सभापती पदाचा अर्ज न भरता महिला बाल कल्याण सभापती पदासाठी अर्ज भरून मदत केली आहे.मतदार यादीतील लेखन दोषासाठी उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र नाकारले जाते नाही.

[ संदर्भ – महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १४ (४) व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १६(३) ]

उमेदवार अथवा सूचक यांच्या नावामधील तांत्रिक दोष किंवा मतदार यादीमधील नमूद केला. नामनिर्देशनपत्रामध्ये नमूद केलेले त्याचे व सूचकाचे नाव व अनुक्रमांक चूकीचा टाकला असेल तर नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात येत नाही.

[ संदर्भ – महाराष्ट्र जिल्हा परिषदा (मतदार विभाग आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १९ व महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूक घेणे) नियम, १९६२ मधील नियम १९ हा नियम पाहता गटनेता ज्ञानेश्वर सुलताने ह्यांची बनवाबनवी स्पष्ट आहे.पक्षा सोबत ही उघड बेईमानी करण्यात आली असल्याने पक्षाने तात्काळ अश्या खलनायकाची हकालपट्टी केली पाहिजे.विकास सदांशिव सहायक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख वंचित बहूजन आघाडी अकोला जिल्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here