शेलवड येथील गायरान प्रकरणाशी ग्रा पं, तीचा संबंध नाही, नोटीसीत गुन्हा दाखल करण्याचा आदेश नसून खुलासा मागितला…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

शेलवड येथील गट क्रं 165 च्या अनधिकृत खोद कामाबाबत शेलवड तलाठी यांनीं नमुना नं 8च्या उताऱ्या चा पंचनाम्यात उल्लेख केला होता, तत्कालीन ग्रामसेवक यांनी प्राप्त नोटीसीला अनुसरून ग्राम पंचायत दप्तरी नमुना नं 8 असेसमेंट रजिस्टर ला कोणतीच नोंदकेली नसल्याचा लेखी खुलासा ग्राम पंचायत कडून कोणताही उतारा व सर्व्हे नं नोंद केली नसल्याचे स्पष्ट लेखी खुलासा मा,तहसीलदार व मा,गटविकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांना ग्राम सेवक संदीप निकम यांनी सादर केला आहे,

या बाबत नरवाडे यांनी सांगितले की तलाठी पारिषे यांना कोणताही उतारा अथवा लेखी जबाब दिलेला नाही, या प्रकरणात ग्राम पंचायत तीने कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही,कुठलीही पावती फाडली नाही,ग्राम सेवकाला गट क्रं165 बाबत नोटीस बजावली होती,की जर मा,उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असेल तर गुन्हा दाखल करण्यात येईल व तात्काळ खुलासा न आल्यास अवमान केल्या प्रकरणी कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल,

परन्तु असा कोणताही प्रकार घडला नाही,असे तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश माळी, यांनी ग्राम पंचायत च्या लेटर हेडवर आपल्या सही शिक्क्या निशी दि,15/10/2020 रोजी लेखी दिले आहे, तसेच ग्राम पंचायत शेलवड ने मागासवर्गीय रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून मा,जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव यांचे कडे ठराव दि 07/09/2020रोजी मंजुरी साठी सादर करण्यात आले आहे, असेही तत्कालीन प्रभारी सरपंच निलेश माळी यांनी सांगितले,

राजकीय द्वेषा पोटी व ग्राम पंचायत ला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे,प्रशासक मयूर कोकाटे यांनी सुद्धा “महा व्हाईस” च्या प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले की ,नरवाडे यांच्या नावाची नमुना नं 8 ला नोंद दिसून येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here