पाझर तलावात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी अंत..!

बुलढाणा – अभिमान सिरसाट

चिखली तालुक्यातील मौजे ग्राम सवणा येथे दिनांक 23/11/ 2021 रोजी गावाला लागून हातणी रोड परिसरातील पाझर तलावात दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान गावातील नामदेव सुभाष गवारे यांची मुलगी कुमारी अंजली वय आठ वर्ष तसेच दामोदर सुभाष गवारे यांचा मुलगा कृष्णा वय सहा वर्ष या सख्या चुलत बहीण भाऊ यांचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार गवारे कुटुंबाचा मेंढी पालनाचा व्यवसाय असून संपूर्ण कुटुंब शेळ्या मेंढ्या व शेती करते. या मुलांची आई दुपारच्या वेळेस सदर परिसरात मेंढ्या तसेच शेळ्या चराई साठी घेऊन गेलेल्या होत्या गावाला लागून असल्यामुळे मुलेसुद्धा आईच्या मागोमाग सदर परिसरात गेले.

दोघे बहिण-भाऊ खेळता खेळता आईचे दुर्लक्ष झालेले असताना सदर पाझर तलावांमध्ये पोहण्यासाठी गेले परंतु त्या पाझर तलावात गाळ असल्यामुळे दोघे ही बहिण भाऊ अज्ञान असल्यामुळे त्यांना पाण्याचा तसेच त्यामधील गाळाचा अंदाज घेता न आल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात तसेच सर्व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here