नदीच्या पात्रात बुडून वडील व मुलाचा दुर्दैवी मृत्यू…सूर्य ग्रहणाची विधी करत असतांना घडली घटना…

सचिन येवले,यवतमाळ

घाटंजी :- आज जागतिक फादर्स डे दिवशी बापलेकाची दुर्दैवी घटना येथील बेलोरा रोडवरील वाघाडी नदीच्या काठावरील शनी मंदिरात पूजापाठ-विधी करण्यासाठी गेले असता. अग्रहारी कुटुंबातील दोन सदस्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.


रविवारी सुर्य ग्रहण असल्याने ग्रहनामधील पूजा अग्रहारी कुटुंबांनी आयोजित केली होती. पूजा पाठ आटोपल्यावर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या अग्रहारी कुटुंबातील संजय शिवाप्रसाद अग्रहारी वय वर्षे 43 व आदित्य संजय अग्रहारी वय वर्ष 12 मुलगा हे दोघे जण नदीच्या काठावरील आंघोळ करीत असताना

खोल पाण्यात बुडून या बाप लेकांचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली व मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले पुढील तपास सुरू आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here