चान्नी फाटा पुलावरून ट्रक कोसळला, दोघे गँभिर जखमी…

सुदैवाने जिवीती हानी टळली…

पातूर – निशांत गवई

वाडेगाव पातुर रस्त्यावर असलेल्या चांन्नी फाट्याजवळ निर्गुणा नदीवरील पुलाचे कठडे तोडून पुलावरून १८ ऑक्टोबर च्या मध्यरात्री अकराच्या सुमारास वाडेगाव वरून पातूर कडे जाणाऱ्या ट्रक पुलावरून खाली पडल्यायाची घटना घडली आहे.पुलाखाली निर्गुणा नदीवर मोठ्या प्रमाणात वाहते पाणी होते.

पुलावरून खाली कोसळण्याची घटना घडली असता मोठ्या प्रमाणात आवाज आल्याने उपस्थित यांनी धावपळ करून जखमींना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना वाडेगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये घेऊन गेले होते.

या मध्ये गँभिर जखमी झालेल्या प्रभात कुमार सेनी वय ५८ यांच्या डोक्याला मार लागला तर दुसरा व्यक्ती तेजपाल नाथ वय ५५ यांना सुद्धा गँभिर दुखापत झाल्याचे उपस्थित यांनी सांगितलं आहे.तसेच वाडेगाव येथे प्राथमिक उपचार करून त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here