Thursday, November 30, 2023
Homeमनोरंजन‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च...१५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित...

‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च…१५ डिसेंबरला हा चित्रपट होणार महाराष्ट्रभरात प्रदर्शित…

Spread the love

मिलिंद अशोक ढोके लिखित-दिग्दर्शित ‘गाफील’

निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल निर्मित ‘गाफील’

गणेश तळेकर

मराठी प्रेक्षक नेहमीच चित्रपटसृष्टीकडून आगळ्या-वेगळ्या आशयाची, विषयाची आणि वेगळ्याच ढंगाची कलाकृती बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. असे अनेक चित्रपट मराठी प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतल्याची उदाहरणं आहेत. यामुळे नवोदित दिग्दर्शकही काहीतरी नवीन, हटके विषयांवर सातत्याने कलाकृती घडवण्यासाठी तत्पर असतात.

असेच एक हरहुन्नरी दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके आपल्यासमोर एक अनोखी कलाकृती चित्रपटाच्या स्वरूपात आणत असून, ‘गाफील’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले.

चित्रपटाच्या ‘गाफील’ या नावामुळेच प्रेक्षकांमध्ये हा चित्रपट नक्की कोणत्या विषयाशी निगडीत असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आदित्य राज आणि वैष्णवी बरडे हे कलाकार या चित्रपटातून कलासृष्टीत पदार्पण करतील.

त्यामुळे ‘गाफील’ हा चित्रपट नक्की कसा असेल, समाज नक्की कशाबद्दल गाफील आहे, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट असेल का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतील. मात्र, त्यांना चित्रपट बघितल्यावरच याची खरी उत्तरं कळतील.

धरती फिल्मस प्रस्तुत व निर्मित, मॅड आर्क पिक्चर्स सहनिर्मित ‘गाफील’ या चित्रपटाचे निर्माते मनोज भेंडे आणि आलेख अग्रवाल हे आहेत, तर मिलिंद अशोक ढोके हे चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. १५ डिसेंबरला हा चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल.


Spread the love
Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: