पातुरात बर्निंग कार चा थरार धावत्या गाडीने घेतला अचानक पेट…

दि – ०२/०७/२०२० पातूर शहरातील बाळापूर पातूर रोडवर ईदगाह नजीक धावत्या गाडीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली.

बाळापूर कडून पातूर नागपूरच्या दिशेने जात असलेली तवेरा क्रमांक MH 23 E 9175 या धावत्या गाडीने पेट घेतला.गाडीमध्ये चालकासह चार महिला व एक पुरुष असे मिळून सहा प्रवासी होते.

सदर गाडीच्या बोनेट मधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच पातूर शहारातील ईदगाह नजीक रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून पाहिले असता गाडीला आग लागल्याचे लक्षात आल्याने तत्काळ सर्व प्रवासी गाडीतून खाली उतरले.

यात सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नसली तरी गाडी मात्र नुकसान झाले.अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिकांनी गर्दी केली होती.कोठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता पातूर पोलिसांनी दखल घेऊन गर्दी हटवली व अग्निशामक दलाला पाचारण केले.यावेळी पातूर नगर परिषद अग्निशामक विभागाचे अशपाक भाई यांनी घटनास्थळावर पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले.

सदर घटनेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नसला तरी, केवळ कुतूहलाने या बर्निंग कारला पाहण्यासाठी जमा झालेल्या बघ्यांच्या गर्दीला पांगविण्यासाठी पातूर पोलिसांची मात्र मोठी कसरत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here